Posts

तू आणि मी

मित्रांनो, खूप दिवस झाले मनात काही तरी घोळत होते, पण सांगड बसत नव्हती... आणि अशातच 'व्हॅलेन्टाईन डे'ला कुठून तरी प्रेरणा मिळाली आणि गोष्टी आपोआप जुळत गेल्या... शब्द साधे आहेत, कुठे चुकलो तर समजून घ्या... तू डोळे, मी काजळ तू डोंगर, मी नदी तू ढग, मी वारा तू कमळ, मी चिखल... तू रस्ता मी दिशा तू श्वास, मी ध्यास तू पाऊस, मी छत्री तू ऊन, मी सावली... तू टेबल, मी खुर्ची तू अंगठी, मी बोट तू चंद्र, मी तारा तू मांजर, मी कुत्रा... तू फळा, मी खडू तू सवय, मी खोड तू सुई, मी दोरा तू चष्मा, मी नाक... तू ऍक्टिवा, मी डिस्कवर तू मायक्रोमॅक्स, मी मोटोरोला तू टेस्टर, मी डेव्हलपर तू कर्वेनगर, मी चंदन नगर... तू घड्याळ, मी टिक टिक तू चिमणी, मी काजळी तू माठ, मी तिवई तू माचीस, मी काडी... तू समुद्र, मी आभाळ तू थंडी, मी ऊब तू हृदय मी धड धड तू सूर, मी ताल... तू शब्द, मी अर्थ तू जांभई, मी झोप तू स्वप्न, मी भास तू पापणी, मी पाणी... तू शिंक, मी सर्दी तू कट्टा, मी गप्पा तू वाळू, मी खोपा तू लाट, मी किनारा... तू रुसवा, मी थट्टा तू अबोला, मी समजूत तू ओठ, मी थर-थर तू भेट, मी ओढ तू प्रतीक्षा... ...

साला, मी काही करू शकत नाही...

रोज उठून तेच-तेच प्रश्न मनात घर करतात, सर्वच नाहीत पण किमान गोष्टी तरी सर्वांना का नाही मिळतात? एकीकडे इतके कपडे आहेत कि कोणते घालू म्हणून गोंधळ, तर दुसरीकडे  काय घालायचे याची विवंचना.... एकीकडे माणसे कमी आणि घरासमोर महागड्या गाड्या असंख्य, तर दुसरीकडे फाटके आभाळ हेच घर... एकीकडे ब्रांडेड शूज आणि चप्पल्स साठी हट्ट, तर दुसरीकडे अनवाणी पायांनी जीवनाचे थैमान... एकीकडे दिवसाचे हजारो रुपये खाण्यावर उडवणारे, तर दुसरीकडे त्यांच्या उष्ट्या अन्नावर जगणे... एकीकडे शाळेसाठी लाखो रुपये डोनेशन भरणारे, तर दुसरीकडे पाटी आणि  पेन्सील चीही नाही कुवत.... एकीकडे दारूचा महापूर, तर दुसरीकडे साध्या पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन-मैल वणवण... का आहे हा एवढा विरोधाभास, कोण आहे याला जबाबदार? एकीकडे  सधन आणि सशक्त, तर दुसरीकडे भकास, ओसाड पडीक माळरान.... साला, आपल्याला काय करायचेय म्हणून स्वतःला रोज समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तेच समोर नाचत असेल, तर मनाची खोटी समजूत तरी कशी काढू? वैतागते मन हे सगळे पाहून...

आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....

आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय.... त्याच त्याच अलंकारिक भाषेला लोक आता कंटाळलेत, तेच तेच वाचून आता तेही वैतागलेत, अशातच मी माझी कथा त्यांच्या समोर मांडतोय, आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय.... दुष्काळाने मनाला पडलेल्या भेगा कागदावर मी मांडतोय, डोळ्यातही आता रडण्यासाठी पाणी शिल्लक नाहीये, यातच मी आशेचे दोन-चार साडे या भेगांवर शिंपडतोय, आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय.... घरूनही येणारा मदतीचा झराया दुष्काळाने आटलाय, जगण्याची तारेवरची कसरत करण्यासाठी मी नवा डाव थाटलाय, पण डोळ्यासमोर पाण्यासाठी हंडे घेऊन उभी असलेली आई मी पाहतोय, उजाड माळरानावरील ढेकलाकडे एक टक पाहणारा बाप मला दिसतोय, आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय.... अभ्यास सोडून रस्ता आता जनावरांच्या छावणीकडे वळतोय, शिक्षणाच्या विचाराने छावानिताला एकटेपणा मला छळतोय, आटले असेल पाणी पण हिम्मतीचा झरा अजून वाहतोय, आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....

तो आणि ती...

                                              तो आणि ती... ती   माझी   छोट्या   छोट्या   गोष्टींवरून   मजा   उडवत   होती , पण   मी   मात्र   शांत   होतो , का ? मी   उत्तर   देऊ   शकत   नव्हतो   का ? तर   नाही ..... मी   उत्तर   देऊ   शकत   होतो ,   पण   मला   ते   द्यायचे   नव्हते ..... मला तर   तिला   फक्त   हसताना   पहायचे   होते , मग   भले   ते   माझ्यावर   का   असेना .....